अकोल्यात मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खळबळजनक माहिती
मनसे कार्यकर्ते जय मालोकर यांच्या मृत्यू प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. जय मालोकर याचा नुकताच पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये जय मालोकर याचा मृत्यू हा हृदय विकाराचा तीव्र झटक्याने नाहीतर मारहाणीमुळे झाल्याचा म्हटले आहे.
अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकरचा मृत्यू मारहाणीने झाला असल्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर अकोला येथे हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, जय मालोकर या मनसे कार्यकर्त्यानेच अमोल मिटकरींची गाडी फोडली होती. अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ल्या झाल्यानंतर मनसे कार्यकर्ता जय मालोकरला जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. विशेष म्हणजे जय मालोकरचा मृत्यू झाला त्यावेळी त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. मात्र नुकताच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, जय मालोकर याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. जय मालोकरला करण्यात आलेल्या मारहाणीत त्याच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण झाली असल्याचे या रिपोर्टमधून समोर आले आहे.