VIDEO: तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न, कल्याणमधील धक्कादायक घटना

मलंगगडच्या पायथ्याशी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला.

कल्याणमधील मलंगगड परिसरात टवाळखोर तरुणांचा उच्छाद सुरू असल्याचं समोर आलंय. या तथाकथित संस्कृतीच्या ठेकेदारांनी मलंगगडच्या पायथ्याशी तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत फिरायला आलेल्या दोन तरुण आणि दोन तरुणींना बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंगही केला. या धक्कादायक घटनेमुळे मलंगगड परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. | Molestation of girl tourist near Malang Gad Kalyan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI