AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Session | अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरणार?

Monsoon Session | अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरणार?

| Updated on: Jul 06, 2021 | 8:55 AM
Share

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं.

अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं. ओबीसी आरक्षणाच्या प्रस्तावावेळी गदारोळ करणाऱ्या आणि असंसदीय वागणूक करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन भास्कर जाधव यांनी केलं. महाविकास आघाडीचे 12 आमदार राज्यपालांनी रोखून धरले, त्याचा बदला जाधवांनी 12 आमदार निलंबित करुन घेतला, अशी चर्चा समाज माध्यमांवर पाहायला मिळाली. तर दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं वागणं तालीबानी वागणं, असल्याचा हल्लाबोल केला. अशा प्रकारे अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला.