Sanjay Raut : ‘ते चु*** आहेत चु***’, राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
Sanjay Raut Press Conference : खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटावर खालच्या अंगाची भाषा वापरत टीका केली आहे.
ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दोन भाऊ एकत्र आल्यावर त्यांच्यानशिबी शून्यच येणार आहे. म्हणून त्यांना हे नको आहे. त्यांची गाळण उडाली आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटावर टीका केली आहे. ही टीका करताना संजय राऊत यांनी शिंदेंच्या नेत्यांसाठी खालच्या अंगाची भाषा वापरली आहे. शिंदे गटाचे नेते हे चु*** आहेत, त्यांच्या मनात द्वेष भरलेला आहे. त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला नको आहे, असं राऊत यांनी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी फक्त एकत्र येण्याचे संकेत दिले तर एवढी आग लागते आहे, धूर निघतो आहे. मग पुढे हे खरच एकत्र आले तर, हे स्वत:ला जाळूनच घेतील, असा शेलक्या शब्दात टोला देखील यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

