Sanjay Raut : ‘कोणी कितीही मागून-पुढून खाजवू द्या’, आम्ही भूतकाळात पडणार नाही; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut Press Conference : उबठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे तसंच राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर शिवसेना उबठा गटाची भूमिका स्पष्ट केली.
संजय राऊत म्हणाले की, कुणी काही बोलू द्या, कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही, असं शिवसेना उबठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना पुनः एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जेव्हा उद्धवसाहेबांनी ठरवले आहे की, एक पाऊल पुढे टाकायचे, तर मग मागे काय झालं याकडे दुर्लक्ष करत पुढे जाणार आहोत, असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, यापूर्वी काँग्रेससोबत नव्हतो तेव्हा त्यांच्यावर आम्ही अनेक टीका केल्या, पण जेव्हा एकत्र यायचे ठरले तेव्हा आम्ही भविष्याचा विचार केला, मागे वळून पाहिले नाही. त्यामुळे भूतकाळात न डोकावणे हे उत्तम राजकारण असते. तसंच राज ठाकरेंच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती, हे जर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कळत नसेल तर मी काय बोलणार. जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली तेव्हाच आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला आहे, असंही यावेळी राऊत यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

