सुप्रिया सुळे यांचा जयंत पाटील यांच्याकडे इशारा? म्हणाल्या, ‘माझा करेक्ट कार्यक्रम केलाय’
याचदरम्यान खासदर सुप्रिया सुळे यांनी थेट जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केलाय असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. सुळे म्हणाल्या की, जयंतरावांनी आपल्याला बोर्डाच्या परिक्षेलाच बसवलं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार आणि शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तर इतर पदाधिकाऱ्यांनीही आपली मत व्यक्त केली. याचदरम्यान खासदर सुप्रिया सुळे यांनी थेट जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम केलाय असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. सुळे म्हणाल्या की, जयंतरावांनी आपल्याला बोर्डाच्या परिक्षेलाच बसवलं. कारण छगन भुजबळ यांच्या भाषणानंतर गंभीर प्रशासकीय भाषण करणे हे जरा अवघड काम. याची जाणीव आणि अडचण अनेक वक्त्यांना येत असतेच. आता ती मालाही आली आहे. त्यामुळे मला असं वाटतयं की जयवंतरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केलाय. तर मला जी पक्षाने जबाबदारी दिली. त्यावर मी खरी उतरते की नाही आता येणारा काळच ठरवेल.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

