MSRTC : ‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, विलीनीकरण सोडाच पण इतिहासात पहिल्यांदाच ST कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार अन्…
साडेचार वर्षांपासून एसटी विलीनीकरणाची आस लावून बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची अजूनही थट्टा सुरू आहे. विलीनीकरण तर दूरच राहिले मात्र मार्च महिन्यामधल्या पगारातील फक्त 56% रक्कमच एसटी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे आणि यावरून कर्मचाऱ्यांनी इशारा दिल्यानंतर सरकार दरबारी आता पूर्ण पगार करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.
डंके की चोट पर सिर्फ विलीनीकरण या नाऱ्याने एसटी संप होऊन तीन वर्ष झाली आहेत. मात्र विलीनीकरण तर सोळाच आता तर एसटी कर्मचाऱ्यांचे अर्धे पगार कुठे विलीन होऊ लागले आहेत, असा प्रश्न पडतोय. मार्च महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त 56% पगार आला आहे. आर्थिक स्थितीमुळे पगार कमी मिळाल्याचा आरोप होतोय. सरकारने एसटी महामंडळाला निम्माच निधी दिल्याने ही वेळ आल्याचा सांगितले जात आहे. त्यामुळे उर्वरित 44% पगार कधी येणार याची प्रतिक्षा एसटी कर्मचारी पाहत आहेत. तीन साडेतीन वर्षांपूर्वी सदावर्ते, सदभाऊ आणि पडळकर या त्रिमूर्तींनी एसटी विलीनीकरणासाठी एल्गार पुकारला होता.
एसटीच विलीनीकरण व्हावं कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच पगार, सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळाच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात मोठा संप तिघांनी घडवून आणला. मात्र विलीनीकरणाऐवजी इतिहासामध्ये पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 44% कट होऊन फक्त 56% पगार आलाय. संपावेळी एका आठवड्यात विलीनीकरण शक्य असल्याचा दावा करणारे सदावर्ते मागच्या साडेतीन वर्षांपासून फक्त विलीनीकरणाचा पाठपुरावाच करतायत. तर दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सत्तेमध्ये आल्यानंतर एसटी विलीनीकरण व्यावहारिक नसल्याचे सांगून खूप आधीच युटर्न घेतलाय. बघा नेमकं कोण काय म्हणाले?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

