Accident | Western Express Highway | मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर आज सकाळी पावसामुळे घसरड्या झालेल्या रस्त्यावर चारचाकी वाहन आणि बसचा अपघात झाल्याची घटना घडली. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावरील रस्ते ओले आणि घसरडे झाले होते. याच कारणामुळे काही वाहनांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली असून अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, पावसाळ्यात रस्ते घसरडे होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अपघातातील आर्थिक नुकसान किती झाले याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.