BJP Mumbai Election 2025: भाजपचा पॅटर्न ठरला, कोणाला उमेदवारी अन् कोणाला प्राधान्य? मुंबईत अशी होणार निवड
मुंबईत भाजपने आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी निवडीचा नवा पॅटर्न जाहीर केला आहे. गुणवत्ता आणि निवडून येण्याची क्षमता हे मुख्य निकष असतील. वॉर्डमधील कामांचे मूल्यांकन, पक्षाच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि जनसेवेचे रिपोर्टकार्ड तयार केले जाणार आहे. निष्क्रिय नगरसेवकांचा पत्ता कापून तरुण उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत भाजपने आगामी निवडणुकांसाठी उमेदवार निवडीचा नवा पॅटर्न निश्चित केला आहे. यानुसार, गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाईल आणि निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल. पक्षाने मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये निरीक्षक नेमले असून, मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांचे आता रिपोर्टकार्ड तयार केले जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच माजी नगरसेवकांच्या कामाचे सखोल मोजमाप होईल. या मूल्यांकन प्रक्रियेत वॉर्डमध्ये केलेली कामे, त्यांची परिणामकारकता, भाजपने दिलेले कार्यक्रम पूर्ण केले आहेत की नाही आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यावर भर दिला जाईल. उमेदवाराची लोकांमध्ये असलेली प्रतिमा देखील तपासली जाणार आहे. ज्या माजी नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक नसेल किंवा जे निष्क्रिय आढळतील, त्यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. या नवीन धोरणामुळे तरुण आणि सक्षम उमेदवारांना संधी मिळू शकते. प्रत्येक वॉर्डसाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, जे उमेदवारांची सखोल तपासणी करतील.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

