Mumbai Corona : दादरच्या पॅथ लॅबमध्ये 12 जणांना कोरोना; महापालिकेकडून लॅब सील

दादर (Dadar) येथील लाला पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या घटनेमुळं खळबळ उडाली असून, महापालिकेच्या वतीनं ही पॅथॉलॉजी लॅब सील करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 25, 2021 | 11:05 AM

मुंबई : कोरोना विषाणू (Corona) संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचं दिसून येत आहे. मुंबईत 24 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार 683 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, दादर (Dadar) येथील लाला पॅथ लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या घटनेमुळं खळबळ उडाली असून, महापालिकेच्या वतीनं ही पॅथॉलॉजी लॅब सील करण्यात आली आहे. सुरुवातीला  लॅबमध्ये काम करणाऱ्या नारायण विजय राणे यांना कोविडची लागण झाली होती. त्यानंतर महापालिकेच्या तपासणीत या लॅबमध्ये काम करणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर दादर पश्चिमेला असलेली ही लाला पॅथ लॅब महापालिकेने सील केली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें