Mumbai | पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर गमावल्याने जीव गेला?
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डोकडिया कुटुंबातील एक पुरुष, एक महिला आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले आणि झोपले. मात्र मध्यरात्रीनंतर सर्वांना अचानक उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेण्यात आले, परंतु प्रकृती खालावत गेल्याने त्यांना उशिराने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.

या प्रकरणी जे. जे. रूग्नालय येथे ‘डेथ ऑडिट’ सुरू करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक माहितीनुसार, रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात सुमारे साडेपाच तासांचा विलंब झाला असून ‘गोल्डन अवर’ गमावल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याचे समोर आले आहे. दरम्यान, फॉरेन्सिक तपासात विषबाधेची शक्यता व्यक्त करण्यात आली असून अन्नामध्ये ‘मॉर्फिन’सारख्या विषारी घटकांचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र एफडीएच्या तपासात कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळून आलेली नाही.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....