Jaykumar Gore यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सुरूवातीला वडुज सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार जयकुमार गोरे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे जयकुमार गोरे यांच्यावर अटकेची लटकती तलवार कायम आहे. मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपली अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सुरूवातीला वडुज सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Published on: Jun 15, 2022 12:21 AM
Follow Us
Latest Videos
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया