AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladies fighting in Train Video : 'तो' हाणामारीचा व्हिडीओ चर्चगेट-विरार लेडीज स्पेशल मधला, वाद कशामुळं? घडलं काय? जखमी महिलेनं सारं सांगितलं

Ladies fighting in Train Video : ‘तो’ हाणामारीचा व्हिडीओ चर्चगेट-विरार लेडीज स्पेशल मधला, वाद कशामुळं? घडलं काय? जखमी महिलेनं सारं सांगितलं

Updated on: Jun 21, 2025 | 11:16 AM
Share

भाईंदर रेल्वे स्थानकात पोलिसांनी महिलेला मदत केली पण मदत करताना तक्रार देण्यासाठी पोलिसांनीच त्यांना घाबरविले.. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली नाही.. आणि गळ्यातील त्यांच्या मंगळसूत्र तुटले असल्याने मारहाण करणाऱ्या महिलेकडून पाच हजार रुपये घेतले आणि त्यातील त्यांना फक्त दोन हजार दिले असल्याचा आरोप ही महिलेने केला आहे. या घटनेमुळे मारहाण झालेली महिला घाबरली आहे

महिला स्पेशल लोकलमध्ये आत शिरण्यावरून दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा संतापजनक प्रकार चर्चगेट-विरार महिला स्पेशल लोकलमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडीओ 17 जूनचा असून, मिरारोड ते भाईंदर दरम्यान ही घटना घडली आहे.

या हाणामारीत 31 वर्षीय महिला प्रवासी जखमी झाली. भाईंदर रेल्वेस्थानाकात या महिलांना उतरवून जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. कर्तव्यवरील पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित महिलेने कोणतीही तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र या व्हिडीओवरून महिलांच्या डब्यात आणि महिला स्पेशलमध्ये महिलेकडूनच महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील जी महिला रक्तबंबाळ अवस्थेत पाहायला मिळाली. त्या महिलेशी tv9 ने संवाद साधला. त्या दिवशी नेमकं काय झालं ही कैफियत त्या महिला प्रवाशाने मांडली आहे. कविता मेदंडकर असे जखमी महिलेचे नाव असून ह्या विरार पूर्व फुलपाडा येथे राहतात आणि मिरारोडला त्या रोज कामाला जातात. 17 जूनला कामावरून परत येत असताना मीरारोडवरून त्यांनी महिला लोकल पकडली. ती लोकल ७.३२ ला भाईंदर स्थानकात पोहचली. याच ट्रेनमध्ये चढताना दरवाजा अडवलेल्या तरूणींमध्ये आणि जिने मारहाण केली त्या महिलेसोबत कविता मेदंडकर वादावादी झाली.

Published on: Jun 21, 2025 11:14 AM