Mumbai Weather Update : मुंबईत सकाळपासून रिमझिम, ढगाळ वातावरण… पुढील 5 दिवस धोक्याचे? IMD चा इशारा काय?
पुढील दोन-तीन दिवस मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यालर्षी महाराष्ट्र आणि मुंबईत लवकर पाऊस दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत सकाळपासूनच रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुंबईसह ठाणे आणि उपनगरातील काही भागांत शनिवारी हलक्या सरी बसरणार असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे तर मुंबईत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होणार अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यासह मुंबईतील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळपासून बरसणाऱ्या रिमझिम पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडतेय. अचानक आलेल्या पावसाने रेल्वे वाहतुकीवरही काहिसा परिणाम झाल्याचे आज दिसून आले. मान्सूनचं आगमन झाल्यानंतर जसं वातावरण निर्माण होतं तसंच आज मुंबईत पाहायला मिळालं. मुंबईत आज सकाळपासून रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या

ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
