Nagpada Accident : पाण्याची टाकी साफ करताना पाच मंजुरांचा दुर्दैवी अंत
Mumbai Nagpada Accident : मुंबईत पाण्याची टाकी साफ करण्यासाठी त्यात उतरलेल्या पाच मंजुरांचा श्वास गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईत नागपाडा येथे पाण्याची टाकी साफ करताना एक दुर्घटना घडली आहे. टाकी साफ करत असताना गुदमरून पाच मंजुरांचा मृत्यू झाला आहे.
नागपाडा येथे असलेल्या एका खासगी विकासकाच्या इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. या इमारतीचे काम सध्या सुरू आहे. या इमारतीत असलेल्या पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी पाच मजूर आज दुपारी त्यात उतरले होते. त्यानंतर त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती खालावल्याने या पाचही मजुरांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या पाचही मंजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published on: Mar 09, 2025 05:32 PM
Latest Videos

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
