VIDEO : Nana Patole On Ajit Pawar | अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार याची वाट पाहतोय : नाना पटोले
राज्यातील महाविकास आघाडीतील खदखद थेट काँग्रेस हायकमांडच्या दरबारात गेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. स्वत: नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने फोडाफोडी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत नेले. भिवंडीतही पक्ष फोडला. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने भाजपसोबत संधान साधून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील महाविकास आघाडीतील खदखद थेट काँग्रेस हायकमांडच्या दरबारात गेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे राष्ट्रवादी विरोधात तक्रार केली आहे. स्वत: नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने फोडाफोडी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत नेले. भिवंडीतही पक्ष फोडला. भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने भाजपसोबत संधान साधून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचं अजूनही भाजपसोबत संधान आहे. सरकारमध्ये असूनही राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अडचणीत आणलं जात आहे. त्याबाबतची तक्रार सोनिया गांधींकडे केली आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं. तसेच सोनिया गांधी यांनी ही तक्रार ऐकून घेतली आहे. येणाऱ्या काळात त्याचे परिणाम निश्चितच दिसून येतील, असा दावाही नानांनी केला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

