Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या…नेमकं घडलं काय?

Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या…नेमकं घडलं काय?

| Updated on: Oct 18, 2026 | 8:09 AM

मुंबईच्या वडाळ्यात एका पादचाऱ्यावर ओला कॅबमधून तिघांनी गोळीबार केला. पादचारी थोडक्यात बचावला असून त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी हमजा आणि अली उर्फ दाऊद खान यांच्यासह तिघांना एका तासाच्या आत अटक केली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुंबईतील वडाळा परिसरात एका पादचाऱ्यावर ओला कॅबमधून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना शनिवार रात्री 10 वाजण्याच्या सुमारास वडाळा चार रस्ता येथील एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ घडली. सुदैवाने, गोळीबारात लक्ष्य असलेला पादचारी थोडक्यात बचावला असून त्याला कोणतीही इजा झालेली नाही.

पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवत अवघ्या एका तासाच्या आत मुख्य आरोपी हमजा आणि अली उर्फ दाऊद खान यांच्यासह एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतले. हल्लेखोर ओला व्हॅनमधून घटनास्थळी आले होते आणि त्यांनी त्यांच्याच ओळखीच्या एका मित्रावर गोळीबार केला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. फॉरेन्सिक टीम आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर राहून पुरावे गोळा करत आहेत. टीव्ही नाईन मराठीसाठी निखिल चव्हाण, आसिफ मलिक सह मुंबई.

 

 

Published on: Oct 18, 2026 8:09 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us