India Pakistan War : भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत….
मुंबईत उद्यापासून फटाके आणि रॉकेट उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 11 मे पासून ते 9 जूनपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे
मुंबईकरांनो तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत उद्यापासून फटाके आणि रॉकेट उडवण्यावर बंदी असणार आहे. मुंबईत ९ जूनपर्यंत मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी असणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून तसे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची तळ पायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी पुन्हा भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताकडून हे हल्ले उधळून लावले जात आहे.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

