मनोज जरांगे पाटलांना शिवाजी पार्क अन् आझाद मैदानाची परवानगी नाकारली, मराठ्यांचं आंदोलन कुठं होणार?
उद्या मुंबईत आमरण उपोषण करण्यावर मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार कायम असताना मनोज जरांगे पाटलांना शिवाजी पार्क अन् आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली
मुंबई, २५ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह मुंबईच्या वेशीवर धडकले आहेत. अशातच उद्या मुंबईत आमरण उपोषण करण्यावर मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार कायम असताना मनोज जरांगे पाटलांना शिवाजी पार्क अन् आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये जरांगे यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन करता येणार नाही, असं म्हटलं आहे. आझाद मैदान आणि शिवाजी पार्क या मैदानांची क्षमता कमी असल्याचं पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना शिवाजी पार्क अन् आझाद मैदानाची परवानगी नाकारली असताना मुंबईमध्ये आंदोलन करणार आणि आरक्षण घेऊनच जाण्यावर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी यावं असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

