मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा टोल वाढला; दरवाढीचा डबेवाल्यांना फटका
Mumbai-Pune Expressway toll Increased : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा टोल वाढला. त्याचा फटका सर्वसामान्यांसह मुंबईच्या डबेवाल्यांना फटका बसणार आहे. डबेवाल्यांना सूट मिळणार का? हे पाहणं महत्वाचं असेल...
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा टोल वाढला. त्याचा फटका सर्वसामान्यांसह मुंबईच्या डबेवाल्यांना फटका बसणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला डबेवाल्यांची गावं आहेत. स्थानिक असल्याने ये जा करताना टोलवाढीचा फटका बसणार अशी चिंता मुंबई डबेवाला असोशिएशनला वाटत आहे. डबेवाल्यांनी रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. ज्या विभागात टोलनाके आहेत त्या विभागातील डबेवाल्यांना किमान टोल मध्ये सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बहुतांश डबेवाले हे पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर कारसाठी येऊन-जावून 640 रूपये मोजावे लागणार आहेत. तर जुन्या महामार्गावर ही टोल वाढ होणार असल्याने डबेबाले चिंतातूर झाले आहेत.
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा

