Mumbai rain live updates: जुईनगरमधील रेल्वे स्टेशन परिसर जलमय

मुंबईत कालपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. हार्बर मार्गावर जुईनगर रेल्वे स्टेशनमध्ये पाणी साचले आहे. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक धीम्यागतीने होत आहे. जुईनगर  रेल्वे स्टेशनचा परिसर जलमय झाला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीलाच मुंबई तुंबू लागल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कालपासून मुंबई आणि मुंबई उपनगरासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पुढील काही दिवस मुंबईमध्ये असाच मुसळधार पाऊस राहण्याची […]

नितीश गाडगे

|

Jul 05, 2022 | 2:56 PM

मुंबईत कालपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. हार्बर मार्गावर जुईनगर रेल्वे स्टेशनमध्ये पाणी साचले आहे. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक धीम्यागतीने होत आहे. जुईनगर  रेल्वे स्टेशनचा परिसर जलमय झाला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीलाच मुंबई तुंबू लागल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. कालपासून मुंबई आणि मुंबई उपनगरासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पुढील काही दिवस मुंबईमध्ये असाच मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगर परिसरातील चेंबूर भागातील सेल कॉलनी या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे सेल कॉलनी परिसरातील या रस्त्यावर जवळपास 3 फुटांपर्यंत पाणी साचलेल आहे. जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें