AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Logging : आदेश जारी... सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी तर काहींना वर्क फ्रॉम होम, बघा काय परिस्थिती?

Mumbai Water Logging : आदेश जारी… सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी तर काहींना वर्क फ्रॉम होम, बघा काय परिस्थिती?

| Updated on: Aug 19, 2025 | 11:01 AM
Share

मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. अशातच हवामान खात्यानं मुंबईला रेड अलर्ट जारी केलाय. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर खासगी कार्यालये/ आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Published on: Aug 19, 2025 10:52 AM