AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांना बेघर केले, तुमचाही नेत्यानाहू होईल!; सामनातून नरेंद्र मोदींवर निशाणा

राहुल गांधी यांना बेघर केले, तुमचाही नेत्यानाहू होईल!; सामनातून नरेंद्र मोदींवर निशाणा

| Updated on: Mar 29, 2023 | 8:06 AM
Share

Saamana Editorial : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. इस्रायल देशाचाही दाखल देण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.हिंदुस्थान म्हणजे पाकिस्तान नाही आणि पाकिस्तानप्रमाणे येथे विरोधकांना बेगुमानपणे चिरडता येणार नाही. इस्रायलप्रमाणे येथील जनतादेखील लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. जेव्हा एक हुकूमशहा लोकशाहीला उखडून फेकण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करते तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात आणि मोदींचे मित्र, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांना पळून जावे लागते. उद्या कदाचित हेच नेत्यानाहू आपले मित्र मोदी यांच्याकडे राजकीय आश्रय मागतील आणि मोदी त्यांना दिल्लीतील एखादा बंगला बहाल करून कर्तव्यास जागतील, पण राहुल गांधींना मात्र बेघर करतील, नव्हे केलेच आहे. इस्रायल देशात जे घडते आहे, त्यापासून दिल्लीतील ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी धडा घ्यावा. नाहीतर तुमचाही नेत्यानाहू होईल! देश त्याच दिशेने निघाला आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

Published on: Mar 29, 2023 08:06 AM