प्रभादेवीत वकिलाच्या घरावर आयकर विभागाचा मोठा छापा! 6 दिवसांपासून कारवाई सुरू
मुंबईतील प्रभादेवीत आयकर विभागाने मोठे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. वकील नीलेश हळदणकर यांच्या घरी आणि त्यांच्या सीए भावाच्या घरी छापे मारण्यात आले आहेत.
मुंबईतील प्रभादेवीच्या एसआरए इमारतीत आयकर विभागाच मोठं सर्च ऑपरेशन सुरू आहे. वकील नीलेश हळदणकर यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. दिल्लीतील आयकर विभागाच पथक गेल्या 6 दिवसांपासून प्रभादेवीत मुक्कामी आहे. या छापेमारीमध्ये आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. वकील नीलेश हळदणकर यांचा भाऊ पेशाने सीए आहे. त्याच्या चेंबुर येथील घरी सुद्धा धाड पडली आहे.
नीलेश हळदणकर हे पेशाने वकील आहे. एसआरए संदर्भातील सगळी कामं करून देत असल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही वर्षात वकील नीलेश हळदणकर यांनी जंगम मालमत्ता कमावल्याचा संशय आयकर विभागाला आहे. नीलेश हळदणकर यांच्या घरातून आयकर विभागाने लाखोंची रक्कम आणि दागिने देखील जप्त केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

