VIDEO : Supriya Sule on Raj Thackeray | राज ठाकरेंच्या भाषणावर सुप्रिया सुळेंची टोलेबाजी
राज ठाकरेंची येत्या महाराष्ट्र दिनाला औरंगाबादमध्ये होऊ घातलेली सभा हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष यावर गांभीर्याने भूमिका मांडत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हा विषय फार गांभीर्यानं घेण्यासारखा नाही, असा पुनरुच्चार केलाय.
राज ठाकरेंची येत्या महाराष्ट्र दिनाला औरंगाबादमध्ये होऊ घातलेली सभा हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष यावर गांभीर्याने भूमिका मांडत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हा विषय फार गांभीर्यानं घेण्यासारखा नाही, असा पुनरुच्चार केलाय. राज ठाकरेंच्या ठाण्यातील उत्तर सभेनंतरही त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर पुण्यातील सभेत त्यांनी औरंगाबादमधील सभेची घोषणा केली. त्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया विचारली असताना, सुप्रिया सुळेंनी या प्रश्नाची खिल्लीच उडवली. तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही तुमचं काम करा ना.. अशा शब्दात त्यांनी हा विषय टोलवला.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

