Accident News : मुंबईहून अंतविधीसाठी निघाले; वाटेतच काळाने गाठलं, अन्..
Car Accident In Ratnagiri : रत्नागिरीमधील खेड येथे कार नदीत कोसळून भीषण अपघात झालेला आहे. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईहून देवरुख येथे अंतविधीसाठी जात नदीच्या पुलावरुन कार नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खेड भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आज सकाळी रत्नागिरीमधल्या भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावरुन ही कार सुमारे १०० फूट खोल नदीत कोसळून हा भीषण अपघात झाला. मुंबईहून देवरुख येथे अंतविधीसाठी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. सर्व अपघातग्रस्त हे मुंबई मिरारोड-भाईंदर येथील रहिवासी आहेत.