Mumbai Bomb Blast Big Update : अन् 189 निष्पापांचे जीव गेलेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचे 12 आरोपी निर्दोष सुटले
मुंबई उच्च न्यायालयाकडून मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे.
कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी
मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पहाणं महत्वाचं ठरेल.
11 जुलै 2006 रोजी मुंबई हादरवून टाकणारी साखळी बॉम्ब स्फोटाची घटना घडली होती. मुंबई लोकलमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तर 827 जण जखमी झाले होते. याच प्रकरणातील आरोपींची आता निर्दोष सुटला झाली आहे. आयएसआयने लष्कर ए तोयबाच्या मदतीने हे स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती. विशेष न्यायालयात जून 2007 साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. 19 ऑगस्ट 2014मध्ये ही सुनावणी पूर्ण झाली. यात विशेष न्यायालयाने 12 आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलिसांनी आपल्याला मारहाण करुन जबाब नोंदवले असा आरोप याप्रकरणातील दोषींनी केला होता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा

