My India My Life Goal : जेव्हा एक चहा विक्रेता आपले गाव प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ घेतो

My india My Life Goal : राजस्थानचे कनाराम मेवाडा हे त्यांचे गाव बिसलपूर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करत आहेत. कनाराम लोकांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांच्या घरातील प्लास्टिक कचरा गोळा करतात.

My India My Life Goal : जेव्हा एक चहा विक्रेता आपले गाव प्लास्टिकमुक्त करण्याची शपथ घेतो
| Updated on: Jul 11, 2023 | 12:05 AM

My India My Life Goals : जेव्हा प्लास्टिकचा ट्रेंड सुरू झाला तेव्हा जगाला वरदान मिळाल्यासारखे वाटले. दुधाच्या पाकिटांपासून कप, चष्मे, खेळणी प्रत्येक गोष्ट प्लॅस्टिकची बनवली गेली. प्लॅस्टिकच्या वस्तू रोजचे काम करू लागल्या. पण काही वर्षांनी कळलं की जगात वरदान म्हणून ज्याला पाहिलं गेलं ते प्लास्टिक आता पर्यावरणासाठी शाप बनलाय.

प्लॅस्टिकमुळे निर्माण होणाऱ्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी जगभरात वैयक्तिक प्रयत्न केले जात आहे. भारत देखील याबाबतीत आघाडीवर आहे. एकीकडे भारत सरकारने 2022 मध्येच प्लास्टिकवर बंदी घातली, तर दुसरीकडे देशात वैयक्तिक प्रयत्नही सुरू झाले.

जर आपण वैयक्तिक प्रयत्नांबद्दल बोललो तर राजस्थानच्या कानाराम मेवाडाबद्दल बोललंच पाहिजे. राजस्थानमध्ये त्यांना कांजी चायवाला म्हणून ओळखले जाते. प्लास्टिक निर्मूलनासाठी पुढाकार घेणारे कनाराम सांगतात की, आम्ही काही वर्षांपूर्वी याची सुरुवात केली.

कनाराम मेवाडा राजस्थानमधील बिसलपूरमध्ये स्वतःची चहाची टपरी चालवतात. कनाराम म्हणतात की, प्लास्टिक हा या जगाचा शत्रू आहे, ज्याला लोकांनी घरात ठेवले आहे. आम्ही आमच्या गावात आणि आजूबाजूला दुधाची पॅकेट, ब्रेडची पाकिटे यासारख्या घरगुती वस्तूंमध्ये वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकचे घरोघरी जाऊन संकलन सुरू केले. त्या बदल्यात आपण लोकांना काही ना काही देत ​​असतो. या योजना दर महिन्याला बदलत राहतात.

कनाराम सांगतात की दर महिन्याला 200 किलोपेक्षा जास्त प्लास्टिक त्यांच्याकडे येते. आणि आम्ही त्याचा पुनर्वापर करत आहोत. ते म्हणतात की, या भागातील लोकांना आता पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी कळू लागली आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कनाराम बाकीच्यांना विनंती करतात की त्यांनी आपली जबाबदारी समजून देशाला पुढे नेले पाहिजे.

Follow us
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.