N .D.Patil यांच्या जाण्याने सामान्य माणसांचा आवाज थांबला : Dilip Walse Patil

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jan 17, 2022 | 4:14 PM

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचं निधनं झालं आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसा पासून कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

डॉ.अशोक भूपाळी (Dr. Ashok Bhupali) यांनी एन.डी. पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. एन.डी. पाटील सर 8 वर्ष आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे, 11 जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अ‌ॅडमिट केलं गेलं होत, अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली होती. ऍडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणताही मोठी उपचार केले नाहीत, असं डॉ. भूपाळी म्हणाले होते. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला होता, असं डॉ. अशोक भूपाळी म्हणाले होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें