आजची सभा ऐतिहासिक होणार, हजारो नाही तर लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार; ‘या’ नेत्याला विश्वास
NCP Leader Prakash Gajbhiye on Mahavikas Aghadi : राष्ट्रवादीचे नेत्याला महाविकास आघाडीच्या सभेवर भाष्य; पाहा व्हीडिओ...
नागपूर : नागपूरमध्ये महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा होतेय. उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेतेही या सभेला उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या होमपिचवर ही सभा होणार असल्याने महाविकास आघाडीचे नेते काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गजभिये यांनीही महाविकास आघाडीच्या सभेवर भाष्य केलं आहे. आजची सभा ही ऐतिहासिक होणार आहे. त्यामुळे हजारोच्या नाहीतर लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. वज्रमुठ सभा ही समतेची एकतेची संविधानाची असणार आहे फुले ,शाहू,आंबेडकर यांची एकतेची ज्योत पेटावी म्हणून सभा आहे रेकॉर्ड ब्रेक सभा असणार असल्याचं वक्तव्य प्रकाश गजभिये यांनी केलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

