Nagpur Rain | विदर्भात पावसाचा कहर, नागपुरात झालेली अशी ढगफुटी तुम्ही कधी पाहिली?
VIDEO | शुक्रवारी रात्री झालेल्या नागपुरातील पावसामुळे उडाला हाहाःकार, विजेचा कडकडाट अन् मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, नागपुरातील एसटी बसेस बुडाल्या तर ४ ते ५ फूट पाण्याखाली बसस्थानक
नागपूर, २३ सप्टेंबर २०२३ | नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी रात्री अचानक पावसाने जोर धरला आणि रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडून ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. कालपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या तलावाचे पाणी नागपुरच्या सखल भागात शिरले आणि डोळ्यांदेखत सर्व काही वाहून गेले. मोरभवन बसस्थानक चार ते पाच फूट पाण्याखाली गेल्याने बसस्थानकाला नदीचं रूप आलं तर बसस्थानकातील सर्व बसेस पाण्याखाली बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. बसस्थानकात पाणी शिरल्याने काही चालक आणि वाहक बसमध्ये अडकल्याने त्यांना एसटीच्या छतावर थांबून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्रभर चालक आणि वाहक एसटीच्या छतावरच अडकून होता. दरम्यान त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान मदत कार्य करत आहे. पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

