Video : नागपुरच्या नंदनवन परिसातील हनुमान मंदिरात चोरी, घटना CCTVमध्ये कैद

नागपुरात चोरट्यांचा (Nagpur Theft) सुळसुळाट पाहायला मिळतोय. नागपूरच्या मंदिरात चोरांनी (Nagpur Mandir Theft) दानपेटीच चोरुन नेली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. चोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. मंदिरातील दानपेटीच चोरांनी पळवून नेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना घडली आहे. नागपूरच्या नंदनवर परिसरामध्ये. नागपूरच्या नंदनवन […]

आयेशा सय्यद

|

Apr 12, 2022 | 5:56 PM

नागपुरात चोरट्यांचा (Nagpur Theft) सुळसुळाट पाहायला मिळतोय. नागपूरच्या मंदिरात चोरांनी (Nagpur Mandir Theft) दानपेटीच चोरुन नेली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. चोरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. मंदिरातील दानपेटीच चोरांनी पळवून नेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना घडली आहे. नागपूरच्या नंदनवर परिसरामध्ये. नागपूरच्या नंदनवन परिसरात हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रात्रीच्यावेळी कुणीही नाही, हे पाहून चोरांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील दानपेटी घेऊन चोरटे बाहेर येऊन पसार झाले आहे. या संपूर्ण चोरीप्रकरणी दोन सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये (CCTV of Theft) संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें