Nagpur News : धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
Nagpur Violence curfew Updates : नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर आता 3 दिवस उलटून देखील संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे. धार्मिक स्थळांबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आता धार्मिक स्थळांसमोर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात कर्णीत आलेला आहे. संचारबंदी असलेल्या मोमीनपुरा येथील जामा मश्जिद परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर गणेश पेठ कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतसुद्धा पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
नागपूरच्या संचारबंदी असलेल्या भागातील सर्व धार्मिक स्थळांना चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. अद्यापही 9 भागात संचारबंदी कायम आहे. त्यामुळे तणावपूर्ण शांतता सध्या नागपूरमध्ये बघायला मिळत आहे. रामजान असल्याने मोठी मश्जिद येथे नमाज अदा करण्यासाठी काहीकाळ शिथिलता देण्यात आलेली आहे. मात्र प्रत्येकाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.