Nagpur News : संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
Nagpur Curfew Updates : नागपूरमध्ये भडकलेल्या राड्यानंतर लागू करण्यात आलेली संचार बंदी आज अखेर तणाव निवळल्यानंतर 6 दिवसांनी काढण्यात आली आहे.
नागपूर हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजेनंतर ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. आज तब्बल 6 दिवसांनी ही संचार बंदी हटवण्यात आलेली आहे. यातील काही भागांची संचार बंदी ही शुक्रवारी काढण्यात आली होती. तर काही भागांना शिथिलता देण्यात आली होती. मात्र असा कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी म्हणून हिंसाचार घडलेल्या भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली होती. आज ही संचारबंदी पूर्णपणे काढण्यात आलेली असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय

साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा

मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
