AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....

Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून….

| Updated on: Oct 09, 2026 | 10:45 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोवा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस नानांच्या केअरटेकरकडून घटनेची सविस्तर माहिती घेणार आहेत, तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी करणार आहेत.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे काल गोव्यात पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या दुर्दैवी घटनेने चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर काल उशिरा पुण्यातील डोंजे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी गोवा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या कलमानुसार, संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यास पोलीस चौकशी करतात, जरी प्रत्येक वेळी गुन्हा घडला असे नाही. नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यावेळी ते गोव्यातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये होते.

गोव्यातील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील तपास करतील. पोलीस आता नानांच्या केअरटेकरकडून घटनेची सविस्तर माहिती घेणार आहेत. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने मध्यरात्री नाना पाटेकर यांनी केअरटेकरला मेसेज केला होता, मात्र त्याने तो पहाटे पाहिला. कॉल न लागल्याने केअरटेकरने तातडीने फ्लॅटकडे धाव घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. निधनावेळी आणि निधनापूर्वी त्यांच्यासोबत कोण होते, याचीही पोलीस माहिती घेणार आहेत.

Published on: Oct 09, 2026 10:45 AM

Follow Us