Honey Trap Special Report : राज्यात राजकारण्यांचं हनीट्रॅप गाजलं; विधानसभेतही उमटले पडसाद
Honey Trap Scam : नाना पटोलेंनी दुसऱ्या दिवशी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात याचे पडसाद बघायला मिळाले.
नाना पटोलेंनी दुसऱ्या दिवशी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला. पटोलेंनी मंत्रालय, ठाणे आणि नाशिक ही हनी ट्रॅपची केंद्रबिंदू असल्याचा आरोप केला. सरकार यासंदर्भात गंभीर नसल्याचं म्हणत पटोलेंनी हे आरोप केलेत. याचवेळी काही सदस्यांनी पेनड्राईव्ह दाखवा, असं पटोलेंना म्हटलं. माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे. सरकार म्हणालं तर दाखवू, असं पटोले म्हणाले. तर तुम्हाला नाव माहिती आहे का?, प्रकरण गांभीर्यानं घेतलं, असं त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे बोलले.
पटोलेंनंतर जयंत पाटलांनीही हा मुद्दा उपस्थित केला. सरकारनं यावर आश्वास्त करावं, असं जयंत पाटील म्हणालेत. त्याच वेळी शिंदेंनीही जयंत पाटलांवर मिश्कील टिप्पणी केली. हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरुन भास्कर जाधवांनीही उभं राहत योगेश कदमांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे एकंदरीतच आता राज्याच्या राजकारणात हनीट्रॅपचा मुद्दा गाजण्याची चिन्ह आहेत.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

