Nana Patole | काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार, कुठल्याही परिस्थितीत माघार नाही : नाना पटोले

आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर (Congress) लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 23, 2021 | 12:46 PM

आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर (Congress) लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी आज कृषी कायद्याविषयीच्या प्रतिचे दहन केले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी खान्देश प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, अतुल लोंढे आ.शिरिष चौधरी माजी खासदार उल्हास पाटील आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें