Sanjay Biyani: गोळीबारात गंभीर जखमी बिल्डरचा मृत्यू, नांदेडमध्ये खळबळ
नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार (Nanded Crime) करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.
Published on: Apr 05, 2022 02:26 PM

