कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी… फायनान्स कपनीवर संशय

कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी… फायनान्स कपनीवर संशय

| Updated on: Oct 25, 2026 | 1:10 PM

नांदेड जिल्ह्यातील माळकौठा येथे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले नागेश कोंकवाड आणि दत्ता गायकवाड हे दोन शेतकरी बेपत्ता झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी बेपत्ता शेतकऱ्यांपैकी नागेश कोंकवाड यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती घेतली आहे.

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमधील माळकौठा येथे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले दोन शेतकरी बेपत्ता झाले आहेत. गावकऱ्यांनी या घटनेमागे फायनान्स कंपनीचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश कोंकवाड आणि दत्ता गायकवाड अशी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांनी माळकौठा येथील एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते.

कर्ज घेतल्यानंतर काही दिवसांतच हे दोघे बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता वाढली आहे. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बेपत्ता झालेल्या नागेश कोंकवाड यांच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे. कर्ज आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे बेपत्ता होणे यामुळे माळकौठा परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे शेतकरी कर्जाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Published on: Oct 25, 2026 1:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us