मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी ‘त्या’ फोन कॉलदरम्यान नेमकं काय बोलला?
नाशिकच्या नामांकित कंपनीतील कथित धर्मांतरणाच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली होती. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला लपवून ठेवण्याच्या प्रकरणातील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल झाला.
नाशिकच्या नामांकित कंपनीतील कथित धर्मांतरणाच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली होती. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला लपवून ठेवण्याच्या प्रकरणातील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांना या प्रकरणात मतीन पटेल आणि निदा या दोघांमध्ये फोनवरून तसेच चॅटद्वारे संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे जाणून घेण्यासाठी आता फॉरेन्सिक टीमकडे मतीन पटेलचा फोन पाठवला जाणार आहे.
या प्रकरणात पोलिस यंत्रणा सखोल तपास करत असून अनेकांना रडारवर घेतलं जात आहे. मतीन पटेल याला पोलिसांनी नोटीस देत काल चौकशीसाठी बोलावले होते. विशेष पोलिस पथकासमोर मतीन यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांच्या सोबत त्यांचे वकील ॲड. अभयसिंग भोसले देखील हजर होते. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी मतीन पटेल याने, ‘महिला मदत मागायला आली, त्यामुळे नगरसेवक म्हणून मी मदत केली,’ असं सांगितलं.
