Video : जायकवाडी धरणातून 47 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू, गोदापात्रात पूरपरिस्थिती
चंदन पुजाधिकारी | Edited By: आयेशा सय्यद, Tv9 मराठी
Updated on: Aug 17, 2022 | 10:11 AM
सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय. नाशकातही पावसांनं दमदार हजेरी लावलीय. जायकवाडी धरणातून 47 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिक पट्ट्यातून पाण्याची आवक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलाय. जायकवाडी धरणाचे दरवाजे तीन फुटाने उचलून विसर्ग सुरू आहे. 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरीच्या नदी […]
सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय. नाशकातही पावसांनं दमदार हजेरी लावलीय. जायकवाडी धरणातून 47 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिक पट्ट्यातून पाण्याची आवक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलाय. जायकवाडी धरणाचे दरवाजे तीन फुटाने उचलून विसर्ग सुरू आहे. 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरीच्या नदी पात्रात पूरपरिस्थिती निर्माण झालीय.