Nashik | नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला कठोर निर्णय, राज्यभरातील…
नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. अलीकडेच यासंबंधात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. नाशिकमधील या आयटी कंपनीची संपूर्ण राज्यातील भरती प्रक्रिया थांबवली गेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांचा तपास होणार आहे.

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ७ महिला कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने वेषांतर करून कंपनीत प्रवेश केला. मीटिंगदरम्यान आरोपींचे आक्षेपार्ह वर्तन प्रत्यक्षात आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करत आरोपींना अटक केली.