AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत

Nashik | नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड; पोलिसांकडून मोठी कारवाई, 5 जण अटकेत

| Updated on: Apr 10, 2026 | 12:21 PM
Share

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिटींगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिटींगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 महिला कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने वेषांतर करून कंपनीत प्रवेश केला. मिटींगदरम्यान आरोपींचे आक्षेपार्ह वर्तन प्रत्यक्षात आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करत आरोपींना अटक केली. या कारवाईदरम्यान 40 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच डिजिटल पुरावे गोळा करून महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यात आली. नाशिक पोलिसांनी या ऑपरेशनमध्ये गोपनीयता राखत मोठी कारवाई यशस्वी केली.
पीडितांच्या तक्रारीनुसार, मुलाखतीपासूनच महिलांना लक्ष्य केले जात होते. “माझ्यामुळे तुला नोकरी मिळाली” असे सांगून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचेही आरोप आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून असिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना अटक करण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या HR अश्विनी चेनानी यांनाही अटक करण्यात आली असून सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Published on: Apr 10, 2026 12:21 PM
Follow Us