ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या नेत्यांच्या विधानाची तुफान चर्चा!

ठाकरेंच्या पक्षात असतानाही शिंदेच आमचे नेते, उमेदवारी मिळताच त्या नेत्यांच्या विधानाची तुफान चर्चा!

| Updated on: Jun 01, 2026 | 3:43 PM

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच पेच निर्माण झाला आहे. जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली. यानंतर दराडे यांनी केवळ एकनाथ शिंदेंचे आभार मानले असे नाही, तर त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच पेच निर्माण झाला आहे. जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली. यानंतर दराडे यांनी केवळ एकनाथ शिंदेंचे आभार मानले असे नाही, तर त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मी शिवसेनेत होतो तेव्हाही शिंदेच आमचे नेते होते’, असे विधान त्यांनी केले आहे. आता या विधानामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, नाशिकची विधान परिषद जागा महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदेंसेनेचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दराडेंनी उमेदवारी अर्ज भरला. पण अर्ज दाखल करण्याआधी काही तास आधीच ट्विस्ट आला असून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेतेही मैदानात उतरणार असल्याचे समजतेय. इतकेच नाही तर गणेश गीते यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरायचे ठरवले आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

Published on: Jun 01, 2026 3:43 PM
Follow Us