Nashik | बँकेबाहेरुन महिलेच्या हातातून बॅग हिसकावून चोर पसार, चोरट्यांचा शोध सुरु

शहरात गुन्हेगारीने हैदोस घातलेला असतांनाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ..नाशिकच्या नेहरू गार्डन परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक शहर शाखेच्या बाहेरून एका ५० वर्षीय महिलेच्या हातातून मोटर सायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी  बॅग हिसकावून पळ काढला.

शहरात गुन्हेगारीने हैदोस घातलेला असतांनाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ..नाशिकच्या नेहरू गार्डन परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक शहर शाखेच्या बाहेरून एका ५० वर्षीय महिलेच्या हातातून मोटर सायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी  बॅग हिसकावून पळ काढला..चोरट्यांनी या महिलेच्या हाताला झटका देऊन त्यांच्या हातातील बॅग पळवून नेली.या बॅगेत पेन्शनचे तब्बल दोन लाख रुपये रोकड तर मोबाईलसह महत्वाचे इतर कागदपत्रे देखील होते..शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या घटनेने, या गुन्हेगारांना पकडण्याचे  पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झाल आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI