नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशिकमध्ये ईडीचं धाडसत्र?

नाशिकः अटकेत असलेले महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये धडक मारल्याचे समोर येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Mar 31, 2022 | 2:34 PM

नाशिकः अटकेत असलेले महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये धडक मारल्याचे समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथे काही भंगार व्यावसायिकांची ईडीने (ED) कसून चौकशी केलीय. त्यामुळे एकच चर्चा सुरूय. मात्र, या प्रकरणी माहिती द्यायला पोलीस आणि प्रशासनाने नकार दिलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें