AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naseem Khan | एमआयएम ही एक गाडी, भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं MIM बोलते - नसीम खान

Naseem Khan | एमआयएम ही एक गाडी, भाजप जेवढे पेट्रोल टाकते तेवढं MIM बोलते – नसीम खान

| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 8:01 PM
Share

भाजपा व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे हे लोकांना माहीत आहे. मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली. आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र आले आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

मुंबई: मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. ओवैसी यांच्या या हल्ल्याला काँग्रेस नेते नसीम खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी संघर्ष करत होतो. भांडत होतो. तेव्हा एमआयएमचे दोन आमदार आणि खासदार कुठे होते? असा सवालच नसमी खान यांनी केला आहे.

नसीम खान यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014मध्ये मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात 5 टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हायकोर्टानेही मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले? फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही? असा सवाल खान यांनी केला आहे.

एमआयएम भाजपची बी टीम

भाजपा व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे हे लोकांना माहीत आहे. मनपा आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांना डोळ्यावर ठेवत ही सभा घेतली. आता सगळीकडे फिरून महाराष्ट्र आले आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

Published on: Dec 12, 2021 08:01 PM