‘येवला सोडून मी कुठेही….,’ काय म्हणाले छगन भुजबळ
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसीय अधिवेशन १८ आणि १९ तारखेला शिर्डीत होत आहे. या अधिवेशनाला नाराज असलेले छगन भुजबळ उपस्थित राहणार का ? असा सवाल केला जात आहे.या छगन भुजबळ यांनी काय म्हटले पाहा...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन होत आहे. १८ आणि १९ तारखेला हे अजित पवार गटाचे हे अधिवेशन शिर्डी येथे होत आहे.या अधिवेशनात राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि नेते हजर राहणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनात राष्ट्रवादीत नाराज असलेले छगन भुजबळ आणि वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार काय ? असा सवाल केला जात आहे. या संदर्भात छगन भुजबळ यांना विचारण्यात आले असताना त्यांनी आपण मुंबईतून दिल्लीत गेलेलो नव्हतो असे स्पष्ट केले आहे. आपण समीर भाऊच्या डोळ्यांच्या डॉक्टरांची भेट घेण्यासाठी चेन्नईला गेलो होतो असे भुजबळ यांनी सांगितले. राज्यसभेत जाणार का असा सवाल केला असता आपल्याला मागे राज्यसभेत जाणार का विचारले होते? आता कुठे जाण्याचा प्रश्नच नाही, मी येवला सोडून कुठे जाणार नाही असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आपले समता परिषदेचे काम सुरुच राहील. आपण कोणताही निर्णय लागलीच घेणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...

कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय

तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली

एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
