Breaking | नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद, विधानभवन परिसरात बंजारा समाजाचं आंदोलन
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलीय. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. आता नामकरण वादात बंजारा समाजाने उडी घेतली आहे.
बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांच्या नेतृत्वात मुंबईत लक्षवेधी आंदोलन करण्यात येतंय. मुंबईच्या विधानभवन परिसरात असलेल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु होतं. यावेळी विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव दिलंच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणादून गेला होता. मात्र आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांची अडवणूक केली.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

