Navi Mumbai : नवी मुंबईत असं काय घडलं की 10 वीच्या मुलीनं संपवलं स्वतःचं आयुष्य, कारण ऐकून तुम्हीही हादराल
नवी मुंबईत दहावीच्या एका विद्यार्थिनीने शिक्षिकेच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉपी सापडल्याने शिक्षिकेने सर्वांसमोर अपमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिक्षिकेविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा रबाळे पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
नवी मुंबईमध्ये एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या अनुष्का नावाच्या विद्यार्थिनीने शिक्षिकेच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. राहत्या घरी गळफास घेऊन तिने आपले जीवन संपवले, असा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काला परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडण्यात आले होते. यानंतर, संबंधित शिक्षिकेने अनुष्काला शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. हा अपमान सहन न झाल्याने अनुष्काने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी, अनुष्काला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली संबंधित शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक वातावरणातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

